मतदानाचा अधिकार बजावा : चर्चचे आवाहन


05th May, 11:35 pm
मतदानाचा अधिकार बजावा : चर्चचे आवाहन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांनी मंगळवारी मतदान केंद्रांवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन चर्चने ख्रिस्ती समुदायाला केले आहे.
कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी काहीच दिवसांपूर्वी धर्मनिरपेक्ष, लोकांचे भले होण्यासाठी काम करणाऱ्या, तसेच संविधानाची मूल्ये जपणाऱ्या उमेदवाराला मत द्यावे, असे आवाहन राज्यातील ख्रिस्ती बांधवांना केले होते. लोकशाहीमध्ये राजकीय जीवनातील निवडी करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर असते, असे मानले जाते. कॅथलिक परंपरेत जबाबदार नागरिकत्व हा एक सद्गुण समजला जातो. तसेच राजकीय कार्यात सहभाग घेणे हेदेखील बंधनकारक कर्तव्य आहे. तुमचे मत हे आपल्या देशाच्या भल्यासाठी केलेले वैयक्तिक योगदान आहे, हे लक्षात घेऊन पात्र मतदारांनी ७ मे रोजी मतदान करावे, असेही त्यांनी म्हटले होते.             

हेही वाचा