गोव्यात रिव्हर्स पॉवर सप्लाय देणाऱ्या इन्व्हर्टरवर घालणार बंदी : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th April, 04:42 pm
गोव्यात रिव्हर्स पॉवर सप्लाय देणाऱ्या इन्व्हर्टरवर घालणार बंदी : मुख्यमंत्री

पणजी :  डिचोली येथे दुरुस्तीकामासाठी खांबावर चढलेले लाईनमन मनोज जांबावलीकर यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ही दुर्घटना रिव्हर्स पॉवर सप्लाय देणाऱ्या इन्व्हर्टरवरमुळे घडली आहे. याची दखल घेऊन वीज खात्यातर्फे लवकरच अधिसूचना काढण्यात येईल. रिव्हर्स पॉवर सप्लाय देणाऱ्या इन्व्हर्टरवर बंदी घालण्यात येईल. तसेच आस्थापनांना कोणत्या पद्धतीचे इन्व्हर्टर वापरावेत याबद्दलही माहिती दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचा

इन्व्हर्टरने घेतला लाईनमन मनोज जांबावलीकरचा बळी

शुक्रवारी म्हाळशी-डिचोली येथे वीज खांबावर दुरुस्तीसाठी चढलेले लाईनमन मनोज जांबावलीकर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. मात्र, यामध्ये जांबावलीकर यांची चूक नसून या भागातील ‘फिटनेस फॅक्टरी’ या आस्थापनाच्या इन्व्हर्टरमुळे त्यांचा मृत्यू झाला. आस्थापनाच्या इन्वर्टरची जोडणी योग्य नसल्याने त्यातून रिव्हर्स सप्लाय आला. त्यामुळेच जांबावलीकर यांना विजेचा धक्का बसल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी स्पष्ट केले होते.

वीज ग्राहक जनरेटरसाठी खात्याची परवानगी घेतात. मात्र, अनेकजण इन्व्हर्टरसाठी परवानगी घेत नाहीत. इन्व्हर्टरवरमधून रिव्हर्स सप्लाय जाऊ नये म्हणून स्विच यंत्रणा बसवणे आवश्यक असते. या स्विचमुळे रिव्हर्स पॉवर सप्लाय होत नाही. मात्र, अनेकदा अशी यंत्रणा देखील बसवली जात नाही. इन्व्हर्टरवर बसवणाऱ्या आस्थापनांनी त्याची जबाबदारी घेणेदेखील आवश्यक आहे, फर्नांडिस यांनी म्हटले होते.

हेही वाचा