अशोक खरातप्रकरण : ‘स्पेशल २६’ची पद्धत वापरून आर्थ‌िक फसवणुकीचे जाळे!

फसवणूक रॅकेटचे धक्कादायक नवे खुलासे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
18 mins ago
अशोक खरातप्रकरण : ‘स्पेशल २६’ची पद्धत वापरून आर्थ‌िक फसवणुकीचे जाळे!

नाशिक : महिलांचे (Womes)  लैंगिक शोषण (Sexual exploitation)  आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत असलेला भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)  सध्या तुरुंगात आहे. मात्र, त्याच्या कारनाम्यांचे नवनवीन खुलासे सतत समोर येत आहेत.

ताज्या माहितीनुसार, अशोक खरातने हिंदी चित्रपट ‘स्पेशल २६’ (Special 26)  मधील पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, खरातने तब्बल १३२ बनावट बँक खात्यांच्या (Bank Account)  माध्यमातून एक संगनमताने चालणारे रॅकेट (Racket)  उभे केले होते.

लाखो ते कोट्यवधी रुपयांचा ‘तडजोडी’चा खेळ 

या योजनेत, खरात स्वतःच्या भक्तांनाच बनावट इन्कम टॅक्स (Income tax)  अधिकारी बनवून इतर भक्तांच्या घरी ‘छापे’ टाकण्यासाठी पाठवत असे. छाप्याच्या नावाखाली भीतीचे वातावरण निर्माण केले जाई आणि त्यानंतर लाखो ते कोट्यवधी रुपयांच्या ‘तडजोडी’चा खेळ सुरू होत असे. विशेष म्हणजे, या संपूर्ण ऑपरेशनमध्ये ‘अधिकारी’ आणि ‘भक्त’ दोघेही त्याचेच माणसे असल्याने संपूर्ण व्यवहार आधीपासूनच ठरवलेला असे.

या बनावट छाप्यांच्या माध्यमातून प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या आर्थिक फसवणुकीचे जाळे किती मोठे आहे, याचा अंदाज लावणेही कठीण झाले आहे.

प्रकरणाचा सखोल तपास सुरू 

दरम्यान, या बनावट ‘रेड’ ऑपरेशनमध्ये आणखी कोणकोण सामील आहे? या रॅकेटमागे मोठी साखळी कार्यरत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उकल तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान बनली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा