
वास्को : झुआरीनगर (Zuarinagar) परिसरातील एका भंगारअड्ड्याला (Scrapyard) आज बुधवारी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत झुआरीनगरमधील भंगाअड्डयांना लागलेल्या आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाने भंगाअड्डयांच्या सुरक्षाव्यवस्थेची काटेकोर तपासणी करून करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.