परदेशात नोकरीचे आमिष दाखवून मडगावातील तरुणाची ४ लाखांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th April, 11:56 pm
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून मडगावातील तरुणाची ४ लाखांची फसवणूक

​मडगाव : विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने मडगावातील तरुणाला ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मडगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी मडगाव शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

आके मडगाव येथील रहिवासी मोझेस फर्नांडिस यांना एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला होता. संशयिताने फर्नांडिस यांना ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून, फर्नांडिस यांनी २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे संशयिताला पाठवले.

​पैसे मिळाल्यानंतर संशयिताने कोणतीही नोकरी उपलब्ध करून न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोझेस फर्नांडिस यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मडगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वदेश देसाई पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा