तब्बल १५० मालिकांमध्ये काम; २७ वर्षांची कारकीर्द, पतीपासून विभक्त होताच निवडला मोक्षाचा मार्ग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 12:37 pm
तब्बल १५० मालिकांमध्ये काम; २७ वर्षांची कारकीर्द, पतीपासून विभक्त होताच निवडला मोक्षाचा मार्ग

मुंबई : यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाच सर्वकाही सोडून अध्यात्म आणि मोक्षाची वाट धरलेल्यांची भारतीय चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदाहरणे सापडतील. साकीब खान, साना खान, जायरा वासिम, अनू अग्रवाल, सोफिया हयात, ममता कुलकर्णी, बरखा मदन, सूचित्रा सेन आणि अनघा भोसले यासारखी अनेक नावे घेता येतील. आज आपण अशा अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत, जी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २७ वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीचा महत्त्वपूर्ण भाग होती. पण आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने अध्यात्माचा मार्ग निवडून साध्वी होणे पसंत केले. ही अभिनेत्री आहे नूपुर अलंकार TV actress Nupur Alankar quits showbiz, said- I sleep on the ground and eat  at the same time | टीवी एक्ट्रेस नूपुर अलंकार ने शोबिज छोड़ लिया संन्यास:  लॉकडाउन में पैसों की

नूपुरचा जन्म १९७२ साली जयपूरमध्ये झाला. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने काही मॉडलिंग प्रोजेक्ट्समध्येही काम केले. यामुळे तिच्या अॅक्टिंग करियरला चांगलाच हातभार लागला. नुपुरने टीव्ही क्षेत्रात काही यादगार अशा भूमिका वठवल्या ज्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. २०२२ साली जेव्हा नूपुरने मनोरंजन क्षेत्र सोडून अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. Nupur Alankar TV Actress unable to admit her mother in hospital Due To  financial Crisis, दीया और बाती हम की एक्ट्रेस ने गहने बेचकर चलाया खर्च, अब  मां का इलाज कराने को

नुपुरने आपण मनोरंजन क्षेत्रातून निवृत्त होत असल्याची घोषणा फेब्रुवारी २०२२मध्ये केली होती. यावेळी आपल्यास योग्य मार्ग दाखवल्याबद्दल तिने तिचे गुरु शंभू शरण झा यांचे आभार मानले होते. मध्ये एका मुलाखतीदरम्यान आपल्या प्रवासाबाबत तिने अनेक गोष्टी उलगडल्या होत्या. नाखुश असल्याच्या अफवांचेही तिने खंडन केले होते. तसेच अध्यात्माच्या मार्गावर चालतांना येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करण्याची ताकद देवच देईल असेही ती म्हणाली होती.  संन्यासी बनने से पहले पति से अलग हुई थीं नुपुर अलंकार, ढाई साल से नहीं रहते  साथ! - former actress nupur alankar separated from husband three years ago  not couple anymore sanyas 

नूपुरचे लग्न अलंकार श्रीवास्तव यांचाशी २००२ साली झाले होते. आपल्या पती आणि सासूशी सल्लामसलत करूनच तिने मनोरंजन क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर जेव्हा तिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा कायदेशीर बाबींचा मार्ग निवडला नसल्याचेही सांगितले होते. संन्यासी बनने से पहले पति से अलग हुई थीं नुपुर अलंकार, ढाई साल से नहीं रहते  साथ! - former actress nupur alankar separated from husband three years ago  not couple anymore sanyas