कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे आजही एअर इंडियाची उड्डाणे रद्द; कंपनीचा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या क्रू मेंबर्सच्या सेक्शनने सामूहिक रजा घेतल्याने आजही एअरलाइनची ७४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 11:36 am
कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे आजही एअर इंडियाची उड्डाणे रद्द; कंपनीचा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या अनेक केबिन क्रू मेंबर्सना नोटीस न देता काढून टाकले आहे.  १०० हून अधिक केबिन क्रू मेंबर्सनी मंगळवारी ड्युटीवर रिपोर्ट केले नाही. त्यामुळे ९० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. दरम्यान आजही एअर इंडिया एक्स्प्रेसच्या क्रू मेंबर्सच्या सेक्शनने सामूहिक रजा घेतल्याने  एअरलाइनची ७४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे.Air India Express to 'curtail flights over next few days' amid cabin crew  crisis | Northeast Live

या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्व क्रू मेंबर्सनी मिळून सीक लिव्हसाठी अर्ज केला आणि रजा घेतली. आता विमान कंपनीने यावर आता कठोर कारवाई करत सुमारे २५ जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. याशिवाय एअरलाइनने संप करणाऱ्या केबिन क्रूला गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कामावर परतण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.

उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत, तिकीट परताव्या व्यतीरिक्त , विमान कंपनीने प्रवाशांना दुसरे विमान निवडण्याचा पर्याय देखील दिला. त्याचबरोबर आता एअरलाइन्स व्यवस्थापनानेही कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सीईओने या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी टाऊन हॉल बैठक बोलावली आहे. Air India Express disruptions: What to do if your flight has been  cancelled? - Hindustan Times

एअर इंडिया एक्सप्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रवाशांसाठी ग्रुप एअरलाइन्ससह पर्यायी फ्लाइटचा पर्याय देत आहोत. प्रवाशांनी लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. याशिवाय विमान कंपनी प्रवाशांना तिकीट परतावा देण्याचा पर्यायही देत ​​आहे.Over 70 Air India Express flights cancelled after cabin crew members go on  mass 'sick leave' - The Week

विमान कंपनीच्या वेबसाइटवर 'फ्लाइट स्टेटस' तपासल्यानंतरच प्रवाशांना घर सोडण्याचे आवाहन एअरलाइनने केले आहे. ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत ते परतावा घेऊ शकतात. विमान कंपनीने सांगितले की, प्रवाशाला कोणतेही अतिरिक्त शुल्क न कापता परतावा मिळेल. प्रवासी मोबाईल क्रमांक +९१  ६३६००१२३४५ वर व्हॉट्सॲपद्वारे रिफंड रिक्वेस्ट सबमिट करू शकतात. याशिवाय तुम्ही airindiaexpress.com वर रिफंड रिक्वेस्ट देखील देऊ शकता.Air India Express fires cabin crew members over 'premeditated' sick leave |  Company News - Business Standard