शॉर्मा खाणे ठरतेय आरोग्यासाठी घातक; मुंबईत एकाचा मृत्यू, १२ जणांची बिघडली प्रकृती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 11:28 am
शॉर्मा खाणे ठरतेय आरोग्यासाठी घातक; मुंबईत एकाचा मृत्यू, १२ जणांची बिघडली प्रकृती

मुंबई : रस्त्यावर तयार होणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने मानखुर्दमध्ये १२ हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश विनोद घोक्षे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर इतर जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे शॉर्माचे आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थांचे गाडे आहेत. यातीलच आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या शॉर्मा विक्रीच्या गाडीवरून प्रथमेशसह त्या भागाातल अनेकांनी शॉर्मा खाल्ला होता. यात प्रथमेशला मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याच दरम्यान महाराष्ट्र नगरमध्ये या गाड्यावरून शॉर्मा खाल्ल्याने वेगवेगळ्या ठिकाणी १० ते १२ जणांनी उपचारासाठी धावही घेतली. यातील चार जण गंभीर असल्याने त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

वरील प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मुंबईच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्याची विक्री केली जाते. यावर पालिकेचे नियत्रणं राहिलेले नाही. यामुळे एक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे, अशी टीका आता होऊ लागली आहे.

दरम्यान, एप्रिल २०२२ मध्ये केरळमधील चेरुवथूर येथील भोजनालयातील शाॅर्मा खाल्ल्याने ५२ हून अधिक लोक आजारी पडले होतील. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. आता मुंबईमध्ये अशीच घटना घडल्याने चिकन शॉर्माविषयी तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

‘या’ कारणांनी शॉर्मा खाणे घातक

* शॉर्मावसाठी चिकन ज्या पद्धतीने तयार केले जाते ती पद्धत विचित्र आहे. आधी चिकन खूप काळ रेप्रिजरेटरमध्ये साठवले जाते. त्यानंतर ते कमी शिवजले जाते. असे मांस  खाल्ल्यानंतर पचनक्रियेवर परिणाम करते. यातून विषारी घटक पोटात तयार होऊन खाणाऱ्याचे आरोग्य बिघडते.

* शॉर्मासाठी वापरण्यात येणारे कापलेले मांस खोलवर ज्वाला जाऊन व्यवस्थित भाजले जात नाही. ते मांस यांत्रिक अग्निवर तासन्तास मंद पद्धतीने भाजले जाते. त्यामुळे, गर्दीच्या वेळी अनेक ग्राहकांना किंचित शिजलेले मांस मिळण्याची शक्यता असते.

* रेफ्रिजरेटमध्ये नीट स्वच्छता नसेल तर मांसाहारी पदार्थांमध्ये ‘साल्मोनेला’ किंवा ‘ई कोलाय’ सारख्या हानिकारक विषाणूंची वाढ होऊ शकते. हे मांस नीट न भाजता खाल्ल्यास त्यातून विषबाधा होऊ शकते, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ जनरल फिजिशियन डॉ. शुचिन बजाज यांनी म्हटले आहे.