उसगावात मृत गायीला बसली धडक; दुचाकी चालक जखमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 04:52 pm
उसगावात मृत गायीला बसली धडक; दुचाकी चालक जखमी

पार-उसगाव येथील अपघातातील दुचाकी.

फोंडा : पार-उसगाव येथे दुचाकीची रस्त्यावर पडलेल्या मृत गायीला बसल्याने मरुद्दीन अन्सारी (२३, पणसुले-धारबांदोडा) हा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून गायीचा मृत्यू झाला होता. मृत झालेली गाय राष्ट्रीय महामार्गावर अंधारात पाडून होती. मरुद्दीन अन्सारी हा जीए-१२बी-२२२१ क्रमांकाची दुचाकी घेऊन सोमवारी रात्री तिस्क उसगाव येथून फोंडा येथे जात होता. पार उसगाव येथील रस्त्यावर अंधार असल्याने मृत गायी पडलेली त्याला दिसली नाही. याच गायीला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमीला सर्व प्रथम पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देविदास पर्येकर यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा