गोव्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ६१.५० टक्के मतदान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 04:37 pm
गोव्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ६१.५० टक्के मतदान

‍पणजी : गोव्यासह देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ जागांसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू झाले. यामध्ये गोव्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ६१.५० टक्के मतदान झाले. यात उत्तर गोव्यात ६१.२८ तर दक्षिण गोव्यात ६१.५० टक्के मतदान झाले आहे. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.

गोव्याच्या दोन्ही मतदारसंघात दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण १३.०२ टक्के मतदान झाले. यात दक्षिण गोव्यात १३.२४ तर उत्तर गोव्यात १२.८० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघातून झाले आहे. येथे एका तासात १७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दक्षिण गोव्यात कुडचडेत सर्वाधिक, तर शिरोड्यात सर्वांत कमी मतदान

दक्षिण गोव्यात ८ ते ९ या एका तासात १३.०२ टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे दक्षिणेतील ४० पैकी ५ मतदान केंद्रांवर या एका तासात एकही मतदार फिरकलेला नाही. दक्षिण गोव्यात एकूण ५ लाख ९८ हजार ७६७ इतके मतदार आहेत. त्यांना मतदान करता यावे, यासाठी ४० मतदान केंद्रे सज्ज आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे पहिल्या फेरीत म्हणजे ८ ते ९ वाजेपर्यंत दक्षिणेत एकूण १३.०२ टक्के मतदान झाले. म्हणजे ६३ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक १६.०४ टक्के मतदान कुडचडे केंद्रावर झाले आहे. तर शिरोडा मतदारसंघात केवल ६ टक्के मतदान झाले आहे. मडकई, फातोर्डा, कुंकळ्ळी, सावर्डे या मतदारसंघात अत्यल्प मतदान झाले आहे. उत्तर गोव्यात साखळीतील मतदान केंद्रांवर सर्वाधिक म्हणजे १७ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल पर्वरीत १४.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान

गोव्यात सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत म्हणजे साधारण ९.३० वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली. दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यात ४९.०४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उत्तर गोव्यात ४८.८८, तर दक्षिण गोव्यात ४९.२० टक्के मतदानाची नोंद झाली. 

हेही वाचा