मतदानानंतर पेडण्यातील नेते काय म्हणाले, वाचा प्रतिक्रिया...

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
07th May, 03:57 pm
मतदानानंतर पेडण्यातील नेते काय म्हणाले, वाचा प्रतिक्रिया...

कोरगाव : निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. मे महिन्यात कडक उष्णता असून सुद्धा जनता जागृत आहेत, हे लक्षात येते. सकाळपासून लोक रांगा लावून मतदान करण्यासाठी थांबलेले आहेत. आपल्या भारताची लोकशाही सुदृढ व योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी सक्षम आहे. आता ४ जून रोजी काय निकाल लागतो, ते पाहुया, असे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. पार्सेकरवाडा-हरमल येथे मतदान झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


पेडण्यात काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलणारे : आर्लेकर

काही सरड्याप्रमाणे रंग बदलणारे नेते पेडण्यात आहेत. ते फक्त स्वत:चा विकास करण्यासाठी आले आहेत. जनतेने पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येण्यासाठी आज मतदान केले आहे. उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीपाद नाईक हे भरघोस मतांनी निवडून येतील, असे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मतदानानंतर म्हटले आहे.


मांद्रेत माझे कोणीही विरोधक नाहीत : आरोलकर

मांद्रे मतदारसंघात माझे विरोधक कोण नाही. मी त्यांचा विरोधक असू शकतो. काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांचे मांद्रे गावात कार्यकर्ते, हितचिंतक आहेत. ते काही मते त्याच्या बाजूने जातील, पण श्रीपाद नाईक लीड घेतील, असे आमदार जीत आरोलकर यांनी म्हटले आहे.


मला अनेक आजी-माजी आमदारांचा पाठिंबा : खलप

पेडणे तालुक्यात मला १५ ते १६ हजार मतांची आघाडी मिळणार आहे. अनेक आजी-माजी आमदारांचा मला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नाही. मला खात्री आहे की, यावेळी बदल होणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार रमाकांत खलप यांनी मतदानानंतर म्हटले आहे.

हेही वाचा