बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 02:04 pm
बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाटणा : बिहारच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश हा इंडि आघाडीला मोठा धक्का आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले. शेखर सुमन अभिनेता असण्यासोबतच अँकर, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे. नुकतेच ते ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये दिसले होते.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी शेखर सुमन दुसऱ्यांदा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याआधी त्यांनी एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पाटणा साहिबमधून निवडणूक लढवली. भाजपचे तत्कालीन उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

...काय म्हणाले शेखर सुमन?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. कालपर्यंत मला माहित नव्हते की मी आज इथे असेन. आयुष्यात अनेक गोष्टी कळत-नकळत घडत असतात. मी येथे अत्यंत सकारात्मक विचाराने आलो आहे आणि देवाचे आभार मानू इच्छितो की त्याने मला येथे येण्याचा आदेश दिला. मी भाजपसोबत आलो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा