गोव्यात राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पहा छायाचित्रे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 10:05 am
गोव्यात राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पहा छायाचित्रे

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ११ राज्यांतील ९३ जागांवर आज सकाळपासून मतदान सुरू आहे. यात गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जागांचा समावेश आहे. या दोन्ही जागांवर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत म्हणजे एका तासांत १३.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या पहिल्या फेरीत राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर आणि दक्षिणेतील उमेदवार तसेच दिग्गज राजकीय नेत्यांनी मतदान केले. पहा गोवन वार्ताचा छायाचित्र वृत्तांत...

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सपत्नीक केले मतदान.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क.


दक्षिण गोव्याचे भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांनी कुटुंबासह केले मतदान.


उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क.


उत्तर गोव्याचे काँग्रेस उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी कुटुंबीयांसमवेत केले मतदान.


भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क.


रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) संस्थापक तथा उ. गोव्याचे उमेदवार मनोज परब यांनी केले मतदान.


 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडचडे येथे बजावला मतदानाचा हक्क.


ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी बजावला मतदानाचा हक्का.


पेडण्याचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.

हेही वाचा