उत्तर गोव्यातील निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी ३ ते ५ मे दरम्यान मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st May, 02:34 pm
उत्तर गोव्यातील निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी ३ ते ५ मे दरम्यान मतदान

पणजी : उत्तर गोवा मतदारसंघात निवडणूक ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान करण्यासाठी इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे ३ ते ५ मे दरम्यान पोस्टल बॅलेट मतदान करता येणार आहे. उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

यानुसार निवडणुकीत भरारी पथक, सहायक निवडणूक अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना इन्स्टिट्युट मिनिझेस ब्रागांझा येथील पहिल्या मजल्यावरील ‘बी’ सभागृहात मतदान करता येणार आहे. तर निवडणूक ड्युटीवर असलेले पोलीस दलातील कर्मचारी, आयआरबी पोलीस आणि होमगार्ड यांच्यासाठी इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा येथील ‘ए’  सभागृहात मतदान करता येईल.

ज्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदानासाठी अर्ज केला होता त्यांनाच वरील केंद्रात मतदान करता येणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठीचे मतदान सुरू झाले आहे. त्यांना ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान मिरामार येथील धेंपे महाविद्यालय पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान करता येणार आहे.