फरसबी @ २४०; एक लिंबू १० रु... ‘असा’ आहे पणजीतील बाजारभाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th April, 03:09 pm
फरसबी @ २४०; एक लिंबू १० रु... ‘असा’ आहे पणजीतील बाजारभाव

पणजी : गोव्यात उन्हाच्या तडाख्यासोबत भाज्यांचे दर देखील वाढत आहेत. सोमवारी पणजी बाजारात फरसबी २४० रुपये किलो होती. तर मोठा लिंबू १० रुपयांना तर, लहान लिंबू ७ रुपयाला एक नग या दराने विकला जात होता. मिरची आणि ढब्बू मिरचेचे दर प्रत्येकी १२० रुपये तर मटार १०० रु. किलो या दराने विकले जात होते. तर  उन्हाळ्याच्या पार्श्वमीवर येत्या काही दिवसांत भाज्यांचे वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

पणजी बाजारात सोमवारी कांदा , बटाटा आणि टोमॅटोचे दर प्रत्येकी ४० रुपये किलो होते. भेंडी, दोडका, गाजर, कारले प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकले जात होते. वांगी आणि काकडीचे दर प्रत्येकी ६० रुपये किलो होते. कोबी ४० रुपये किलो तर फ्लॉवर ४० रुपये प्रती गड्डा होता. याशिवाय कोथिंबीर २५ ते ३० रु., पुदिना १० रु. तांबडी भाजी आणि मेथी प्रत्येकी १५ रुपयेला जुडी होती. आले २०० रुपये तर लसूण ४०० रुपये किलो होते.

फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २६ रु., टोमॅटो २८ रु. तर बटाटा ३७ रुपये किलो होता. तर भेंडी २० रु., कोबी २९ रु., गाजर ४३ रु., फरसबी १७५ रु., मिरची ७० रुपये किलो दराने विकली जात होती. फ्लॉवरचे दर प्रतिनग २७ रुपये होते.

मानकुराद ६०० ते ८०० रुपये डझन

पणजी बाजारात मानकुराद आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, त्या मानाने दर अजूनही चढे आहेत. मध्यम आकाराचा मानकुराद आंबे ६०० ते ८०० रुपये तर मोठे मानकुराद आंबे दीड हजार रुपये डझन दराने विकले जात होते. तर हापूस आंबा ६०० ते ८०० रुपये डझन होता.

हेही वाचा