ई-मेलवरून दाबोळी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 02:46 pm
ई-मेलवरून दाबोळी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळ उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याने खळबळ माजली आहे. या ई-मेलची गंभीर दखल विमानतळ अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनी घेतली आहे. विमानतळावर बॉम्ब शोधक पथक उपस्थित असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

गोव्यातील दाबोळी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लगेच त्याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी धनंजय राव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. आम्ही आता अतिरिक्त खबरदारी घेत आहोत. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फ्लाइट ऑपरेशन्सवर परिणाम कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी दक्ष आहोत. गोवा पोलिसांना विमानतळ प्राधिकरणाकडून औपचारिक तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी हजर आहे, असे धनंजय राव यांनी म्हटले आहे.

आम्ही सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कसर सोडत नाही. आम्ही निर्धारित प्रोटोकॉलनुसार काम करत आहोत. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहोत. दरम्यान, सध्या ईमेलचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही राव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा