‘नरेंद्र मोदींमुळे लग्न होईना’... पाकिस्तानी मौलवीचा व्हीडिओ व्हायरल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 12:14 pm
‘नरेंद्र मोदींमुळे लग्न होईना’... पाकिस्तानी मौलवीचा व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक पाकिस्तानी मौलवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विचित्र विधान करताना दिसत आहे. या मौलवीला भारतीय महिलेशी लग्न करायचे होते. पण, मोदींमुळे हे लग्न मोडले. अजून माझे लग्न झालेले नाही, असे दावे त्याने सोशल मीडियावरून केले आहेत.

पाकिस्तानी इस्लामिक धर्मगुरूने त्याचे लग्न न होण्यासाठी मोदींना जबाबदार धरले आहे. यामुळे त्याच्या मनातील इच्छा अपुऱ्या राहिल्या. त्या इच्छा अश्रूंमध्ये वाहून गेल्याचे आणि जिच्याशी लग्न होणार होते तिची मुले आता ‘मामू’ म्हणत असल्याचे त्याने गमतीने व्हीडिओमध्ये म्हटले आहे.

या मौलवीने २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्याच्या घटनेचा संदर्भ देत आपले मत मांडले आहे. ‘माझे लग्न भारतात होणार होते. पण नंतर तिथे मोदी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर व्हिसाच्या समस्या निर्माण झाल्या. म्हणून आम्हाला वाटले जाऊ दे. पुढच्या निवडणुकीत (म्हणजे २०१९ मध्ये) विचार करू, पण पुढच्या निवडणुकीत मोदी साहेबच सत्तेत आले. मग आम्हाला वाटले की अजून दहा वर्षे कोण वाट पाहणार. पुढच्या वेळी तेच सत्तेवर येणार असल्याने आम्ही इथेच बसलो आहोत... त्यामुळे आम्ही लग्न करत नाही’, असे मौलवीने म्हटले आहे.Pakistani preacher Tariq Jamil visits Melbourne - AMUST

‘ट्रूनिकल’ नावाच्या अकाऊंटवरून पाकिस्तानी मौलवीशी संबंधित वक्तव्याचा व्हीडिओ X वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा