गृहमंत्री अमित शहांची ३ मे रोजी म्हापशात सभा

पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर : तानावडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 04:12 pm
गृहमंत्री अमित शहांची ३ मे रोजी म्हापशात सभा

पणजी : लोकसभा निवडणुकीतील गोव्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ मे रोजी गोव्यात दाखल होणार असून, त्यांची जाहीर सभा म्हापसा येथे होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.Give us 35 seats, we will stop infiltration, Amit Shah tells West Bengal  voters - The Week

लाेकसभा निवडणुकीसाठी गोव्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे नऊ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी गोव्यात येऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण गोव्यातील सांकवाळ येथे जाहीर सभा घेत दोन्ही उमेदवारांचा प्रचार केला. मोदींच्या या सभेला राज्यातील सुमारे ५० हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. मोदींनंतर आता अमित शहा ३ मे रोजी म्हापशात सभा घेणार आहेत.SADANAND SHET TANAVADE (Modi Ka Parivar) (@ShetSadanand) / X

दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्यातील प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. त्यातील स्थानिक स्टार प्रचारकांनी राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काळात केंद्रीय पातळीवरील अनेक नेते गोव्यात सभा घेऊन दोन्ही उमेदवारांचा प्रचार करतील, असेही तानावडे यांनी नमूद केले.