२००० बनावट ग्राहक आणि एकच बँक खाते; 'असा' उघडकीस आला मिझोरममधील १५० कोटी रुपयांचा घोटाळा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 03:45 pm
२००० बनावट ग्राहक आणि एकच बँक खाते; 'असा' उघडकीस आला मिझोरममधील १५० कोटी रुपयांचा घोटाळा

आयझॉल:  मिझोरममध्ये पोलिसांनी १५०  कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. या लोकांवर आरोप आहे की त्यांनी मिळून २००० बनावट लोकांचे एकच बँक खाते तयार करून त्यांना वाहन कर्ज वाटप केले. त्यात एरिया बिझनेस मॅनेजरचाही सहभाग होता.आयझॉलमध्ये पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी या घोटाळ्याची माहिती दिली. संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना डीजीपी अनिल शुक्ला म्हणाले की, हा ईशान्येतील सर्वात मोठा ऑटो घोटाळा असू शकतो. या घोटाळ्यात पाच कार डीलर्सचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.Massive Rs 150 Crore Vehicle Loan Fraud Busted in Mizoram, 11 Arrested

महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आसाममधील तेजपूर येथील रहिवासी असलेल्या मिझोरम क्षेत्र व्यवसाय व्यवस्थापक जाकीर हुसैन (४१) विरुद्ध आयझॉल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, २० मार्च रोजी फसवणूक उघडकीस आली.

अनिल शुक्ला यांनी सांगितले की, आरोपींनी २०२० साली महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या नावाने बनावट खाते उघडले. याच खात्यातून सर्वाधिक वाहन कर्ज वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण घोटाळा चार वर्षांच्या कालावधीत झाला. पोलिसांनी गेल्या महिन्यात तपास सुरू केला व आयपीसीच्या कलम ४०८, ४६७, ४६८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मंडळाचे प्रमुख अंकित बॅनर्जी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहन कर्ज वाटपाच्या नावाखाली घोटाळा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर आरोपी कोणाला संशय येऊ नये म्हणून एका खात्यातून दुसऱ्या खात्यांत वेळोवेळी व्यवहार करत असल्याचे उघड झाले. तसेच कर्ज मंजूर करून ते २००० ग्राहकांना दिल्याचे कागदोपत्री रेकॉर्ड ठेवले. ऑडिटच्या वेळी मुख्य आरोपी या फायली गायब करायचे असेही तपासाअंती आढळून आले आहे. पोलिसांनी आरोपीला २९ मार्च रोजी अटक केली. 11 arrested in Mizoram for Rs 150-crore financial fraud: DGP

पोलिसांनी एका मुख्य बनावट बँक खात्यासह तब्बल २६ बँक खाती जप्त केली असून त्यात अडीच कोटी रुपये जमा आहेत. याशिवाय ३ कोटी रुपयांच्या १५  गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून तीन लॅपटॉप, १० मोबाईल फोन,५४९ बनावट खात्याच्या फाइल्स, २५ बनावट सील आणि ३० सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ३ कार डिलर्सनी तब्बल ४७ कोटींची रक्कम थेट महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडे जमा केली. चौकशी दरम्यान आरोपींनी कंपनीच्या केवायसी प्रक्रिया, टेलीकॉलिंग, ऑडिटिंग आणि इतर गोष्टींतून व्यवस्थित पळवाटा शोधून हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. Rs 150 Crore Scam in Mizoram - Pegcityexpats

हेही वाचा