महादेव बॅटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खान मुंबई क्राईम ब्रांच एसआयटीच्या ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 02:26 pm
महादेव बॅटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खान मुंबई क्राईम ब्रांच एसआयटीच्या ताब्यात

मुंबई :महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या एसआयटीने अभिनेता साहिल खानला ताब्यात घेतले आहे. त्याला छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळल्यानंतर त्याला मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) छत्तीसगडमध्ये अटक केली आहे.Mahadev Betting App Case : आज पुलिस के सामने पेश होंगे साहिल खान

याप्रकरणी एसआयटीने अलीकडेच खानची चौकशी केली होती. मुंबई क्राईम ब्रॅंच एसआयटी सध्या महादेव बॅटिंग अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांनी केलेल्या इतर गुंतवणुकीच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार ,  महादेव बॅटिंग अॅप घोटाळा तब्बल १५ हजार कोटींचा असून अजूनही बऱ्याच गोष्टी उजेडात यायच्या आहेत. Mahadev Betting App: बॉलीवुड एक्टर साहिल खान छत्तीसगढ़ से गिरफ्तार, महादेव  बेटिंग ऐप केस में मुंबई एसआईटी की बड़ी कार्रवाई... | Mahadev Betting App:  Bollywood actor ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल खान आणि इतर ३१  जणांविरोधात चौकशी सुरू असून त्यांची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या चित्रपटात काम केलेला साहिल खान फिटनेस एक्सपर्ट आहे.What is Mahadev Betting App Scam, Who are the Masterminds?

साहिलने दावा केला होता की त्याचा करार २४ महिन्यांसाठी होता, त्याच्या सोशल मीडियावर प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी त्याला मासिक पेमेंट ३ लाख रुपये दिले जात होते. असे असतानाही बेकायदेशीर कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे कारण देत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.