सेक्स स्कॅडलमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने एकाची आत्महत्या; तरुणीला १० वर्षांचा तुरुंगवास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 03:27 pm
सेक्स स्कॅडलमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने एकाची आत्महत्या; तरुणीला १० वर्षांचा तुरुंगवास

उदयपूर : सेक्स स्कँडलमध्ये अडकण्याची भीती दाखवून एका तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात न्यायालयाने एका मुलीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास तिला एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. हा निवाडा राजस्थानच्या श्रीगंगानगरचे जिल्हा न्यायाधीश डॉ. महेंद्र के. एस. सोळंकी यांनी आहे.

आत्महत्येही घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. बसंती चौकाजवळील चावला कॉलनीत राहणारा राधेश्याम साई यांचा मुलगा राजेंद्र साई याने २०२० मध्ये पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये १० जुलै २०२० रोजी सकाळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या खोलीत गळफास लावून घेतल्याचे सांगण्यात आले होते. नंतर जेव्हा राजेंद्र साईने खोलीत ठेवलेली बॅग बघितली तेव्हा त्यात दोन सुसाईड नोट सापडल्या. त्यामध्ये  जयपूरचे रहिवासी पायल गुप्ता आणि हॉटेल व्यवस्थापकासह सुधीर त्यागी यांनी वडिलांना सेक्स स्कँडलमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर राजेंद्र साई यांनी वडिलांचा मोबाईल तपासला असता पायल गुप्ता, सुधीर त्यागी आणि करण सिंग यांनी त्यांना व्हॉट्सॲप मेसेजद्वारे त्रासदायक मेसेज पाठवल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे समजले. वडिलांना घाबरवून आरोपींनी अडीच लाख रुपयेही घेतल्याचे राजेंद्र साईंनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पायल गुप्ता, सुधीर त्यागी आणि करण सिंग आणि इतर साथीदारांविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. ही माहिती सरकारी अधिवक्ता राजीव कौशिक यांनी दिली आहे.

नाव बदलून मारायचे गप्पा

मल्हारगढ जिल्हा मंदसौर येथील रहिवासी ज्योती शर्मा तरुणीने स्वतःचे नाव बदलून पायल गुप्ता ठेवल्याचे नंतर पोलीस तपासात आढळून आले. त्याच नावाने फोन आणि व्हॉट्सॲपवर राधेश्यामशी ती चॅट करत होती, असेही पोलीस तपासात उघड झाले.  त्याचप्रमाणे ललित गुप्ता उर्फ ​​ललित बैरवा हा देखील राधेश्यामला करणसिंग म्हणून ब्लॅकमेल करत होता, असे आढळून आले. पोलिसांनी नंतर दोघांना जयपूर येथून अटक केली. यावेळी ललित बैरवाची आजारपणामुळे पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. न्यायालयाने सोमवारी सुनावणी घेतली आणि सर्व पुराव्यांच्या आधारे ज्योती शर्मा हिला दोषी ठरवले. आता तिला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.