नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर.. १० जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 01:08 pm
नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर.. १० जणांचा मृत्यू

क्वालालंपूर : मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशातच टक्कर होऊन मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. ही दुर्घटना लुमुट नौदल तळावर आज सकाळीच्या सुमारास घडली.

Watch: 10 killed after two navy helicopters collided mid-air in Malaysia -  BusinessToday

रॉयल मलेशियन नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. याच  कार्यक्रमाचा सराव सुरू असताना आकाशात दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. सकाळी ९.३२ वाजण्याच्या सुमारा हा अपघात झाला. HOM (M503-3) आणि Fennec (M502-6) या मॉडेल्सची ही दोन हेलिकॉप्टर्स होती. लुमुट नौदल तळावर ही टक्कर झाली. दोन्ही हेलिकॉप्टरमधील सर्व १० क्रू सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांना ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा