आजोबांकडून नातीवर १० वर्षे बलात्कार; वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 04:15 pm
आजोबांकडून नातीवर १० वर्षे बलात्कार; वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

मुंबई : मुंबईतून एका व्यक्तीने स्वतःच्याच १९ वर्षांच्या नातीवर सतत १० वर्षे बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने पीडितेला घडलेल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकही केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या जवळ जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. आरोपी २०१४ पासून मुलीचा लैंगिक छळ करत होता. तो मुलीचा मानसिक करत असे, असा आरोप आहे. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. या कारणास्तव पीडितेने कधीही कोणाला काहीही सांगितले नाही. हे प्रकरण मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपी हा मुलीचा सावत्र आजोबा असून शेजारच्या घरात राहतो.

काही दिवसांपूर्वी पीडितेने हिंमत एकवटून  घरच्यांना सर्वकाही सांगितले. तक्रारीच्या आधारे कुरार पोलिसांनी १८ एप्रिल रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. त्याच्याविरुद्ध कलम ३७६ (२)(एफ)(एन), ३५४, ३४५ ए, ३२३, ५०४ आणि ५०६ तसेच आयपीसीच्या पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासांनंतरच पोलिसांनी आरोपीला विरार परिसरातून अटक करत पुढील कारवाई सुरू केली.


हेही वाचा