चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षांच्या मुलीची बिघडली तब्येत; झाल्या रक्ताच्या उलट्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 03:34 pm
चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षांच्या मुलीची बिघडली तब्येत; झाल्या रक्ताच्या उलट्या

पटियाला : पंजाबमधील लुधियानामध्ये एका दीड वर्षाच्या मुलीला चॉकलेट खाल्ल्यानंतर रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मुलीसाठी चॉकलेट पटियाला शहरातून विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. या वृत्ताने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून अधिकारी तातडीने ज्या दुकानातून चॉकलेट खरेदी करण्यात आले होते तेथे पोहोचले. विकण्यात आलेले चॉकलेट्सची एक्सपायरी तारीख उलटून गेल्याचे तपासात समोर आले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याच शहरातून काही दिवसांपूर्वीच १० वर्षीय मुलीचा चॉकलेट केक खाल्ल्याने वाढदिवशीच मृत्यू झाला होता.Punjab: OMG! चॉकलेट खाने से मासूम की चली गई जान - innocent child lost his  life after eating chocolate-mobile

मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षांची रविया लुधियाना येथून पटियाला येथे पाहुण्यांच्या घरी आली होती. तिला निरोप देताना, एका नातेवाईकाने नजीकच्या एक दुकानातून चॉकलेट्स आणि इतर खाद्यपदार्थ असलेली गिफ्टपॅक दिली होती. लुधियानाला पोहोचल्यानंतर जेव्हा रवियाने चॉकलेट्स खाल्ल्या तेव्हा काही वेळानेच तिच्या पोटात मळमळू लागले व रक्ताच्या उलट्या होवू लागल्या. सुरुवातीला घरच्यांना वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, मुलीची प्रकृती सतत बिघडत गेल्याने पालकांची चिंता वाढली. Punjab: Toddler Vomits Blood, Dies After Consuming Expired Chocolate in  Ludhiana; Probe Underway As Health Department Collects Samples From Patiala  Shop (Watch Videos) | 📰 LatestLY

पाहुण्यांनी दिलेली गिफ्ट पॅकमधील चॉकलेट्स खाल्ल्याने एका २२ वर्षीय मुलीची देखील तब्येत बिघडली होती. कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी तातडीने मुलीला डॉक्टरांकडे नेले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी मुलीला सीएमसी रुग्णालयात दाखल केले. जिथे मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मुलीच्या पाहुण्यांना मिळताच त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याची रीतसर माहिती दिली व त्यांना घेऊन तडक मिठाईच्या दुकानात गेले. तेथे तपासणी केल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर चॉकलेट्सची एक्सपायरीची तारीख कधीच उलटून गेल्याचे लक्षात आले. Chocoloony Chocolate Gift Pack 20 pcs (120gm) For Valentine, Anniversary,  Birthday, Diwali, Christmas, Caramels Price in India - Buy Chocoloony Chocolate  Gift Pack 20 pcs (120gm) For Valentine, Anniversary, Birthday, Diwali,  Christmas,

आरोग्य विभागाच्या पथकाने दुकानातील एक्सपायरीची तारीख उलटून गेलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या. यानंतर पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवून याप्रकरणी तपास सुरू केला . एक्सपायरीची तारीख उलटून गेलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केल्याबद्दल चौकशीही आरोग्य विभागाने सुरू केली आहे.Patiala 10-year-old dies on her birthday after eating online-ordered cake  from a 'cloud kitchen'

काही दिवसांपूर्वी पटियालामध्येच ११ वर्षीय मुलगी मानवीने तिच्या वाढदिवसानिमित्त Zomato वरून ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. ते खाल्ल्यानंतर माधवीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. तपासणी केली असता, ज्या बेकरीमधून केक ऑनलाइन मागवला गेला, ती बेकरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. तसेच केकही शिळा असल्याचे तपासणीअंती आढळून आले होते. Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday

हेही वाचा