भारतात विकल्या जाणाऱ्या 'या' बेबी फूडमध्ये आढळून आले प्रमाणापेक्षा अधिक साखरेचे प्रमाण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 02:34 pm
भारतात विकल्या जाणाऱ्या 'या' बेबी फूडमध्ये आढळून आले प्रमाणापेक्षा अधिक साखरेचे प्रमाण

नवी दिल्ली : बेबी फूड उत्पादनांसाठी जगप्रसिद्ध असलेली कंपनी नेस्ले सध्या वादात सापडली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्ले सेरेलॅकमध्ये कंपनी ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त साखरेचा वापर करत असल्याचे नुकतेच एका अहवालातून समोर आले आहे. तर युरोप आणि इतर देशांमध्ये हे प्रमाण नगण्य आहे. ही माहिती एका स्विस स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. Consumer Affairs Min asks FSSAI to probe composition of Nestle's Cerelac  sold in India

अहवालात म्हटले आहे की भारताव्यतिरिक्त आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालात नेस्लेच्या जवळपास १५० उत्पादनांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांसाठी बनलेल्या आहारात साखरेचा समावेश न करण्याबाबत सल्ला दिला आहे कारण त्यामुळे बालपणातील लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.Nestle adds sugar to infant milk and Cerelac in india and many countries  but not in Europe and uk - India Hindi News - बच्चों को Nestle का दूध और  सेरेलेक देने

प्रमाणापेक्षा जास्त साखर मुलांच्या आरोग्यासाठी घातक 

आरोग्य तज्ज्ञ लहानपणापासून मुलांना गोड पदार्थ खाऊ घालण्यास मनाई करतात. मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार बाळाला देऊ नये. साखरेचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, दात किडणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. Unaware Rural Parents Are Harming Their Children Under Guise of Love and  Care

नेस्लेचे दूटप्पी धोरण ठरतेय मुलांच्या आरोग्यासाठी घातक 

तपासणीत असे आढळून आले की भारतात विकल्या जाणाऱ्या सेरेलॅकच्या सर्व प्रकारांमध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सरासरी ३ ग्रॅम जास्त साखर असते. तर आफ्रिकेतील इथिओपिया आणि आशियातील थायलंड यांसारख्या देशांमध्ये प्रति सर्व्हिंगमध्ये सरासरी ४  ते ६  ग्रॅम साखर आढळून आली आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब चिंताजनक आहे.मात्र, जर्मनी आणि लंडनसारख्या विकसित देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये साखर आढळली नाही. Nestle Cerelac Infant Cereals with Milk 250G FROM 8 MONTHS(RICE&CHICKEN /  OAT,WHEAT&PRUN / WHEAT,HONEY&DATES)雀巢Cerelac婴儿谷物牛奶250克  (大米和鸡肉/燕麦,小麦和普伦/小麦,蜂蜜和枣) | Lazada

नेस्ले कंपनीने स्पष्टीकरण दिले

२०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत २५० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त विक्रीचे लक्ष्य गाठण्यासाठी नेस्लेने हे केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नेस्ले कंपनीने गेल्या काही वर्षांत नेस्लेच्या बेबी फूड उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण सुमारे ११  टक्क्यांनी कमी केल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की नेस्लेच्या सर्व उत्पादनांवर एकूण साखरेचे प्रमाण स्पष्टपणे लिहिलेले आहे. काहीवेळा नियामक आवश्यकता, स्थानिक घटक आणि पाककृती यामुळे लहान प्रमाणात वर खाली असू शकते.Nestle Faces Backlash Over Added Sugar in Baby Food Products, Stocks Take A  Huge Hit

हेही वाचा