गोव्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी... यलो अलर्ट जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 09:49 am
गोव्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी... यलो अलर्ट जारी

पणजी : पुढील काही दिवस उष्णतेचा पारा चढा राहणार असून दोन दिवस हवामान ढगाळ राहील, असा अंदाज काल हवामान खात्याने वर्तवला होता. तसेच पावसाची शक्यता नाही, असेही नमूद केले होते. मात्र, आज सकाळपासून उत्तर आणि दक्षिण गोव्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानुसार लगेच पणजी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.


गोव्यात १९ ते २१ एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट असण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाची शक्यता नाही. २२ ते २५ एप्रिल दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे, असा अंदाज पणजी हवामान खात्याने काल दुपारी वर्तवला होता. पण, हा अंदाज पावसाने खोटा ठरवला. गोव्याच्या बहुतांश भागांत पहाटेपासून आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर अनेक भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेच हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला.


दरम्यान, यलो अलर्ट असल्याने नागर‌िकांनी घराबाहेर पडताना दक्ष रहावे. विजा चमकत असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मोकळ्या मैदानावर जाऊ नये, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा