मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, ईव्हीएमची तोडफोड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 03:50 pm
मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, ईव्हीएमची तोडफोड

इंफाळ : मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचार झाला आहे. बिष्णुपूर मतदारसंघातील मतदान केंद्रावर गोळीबार करण्यात आला असून गोळीबारानंतर संतप्त जमावाने ईव्हीएम मशीन फोडले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाला आहे. १.८७ लाख मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १०२ जागांवर मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १६०० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.

मणिपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचार झाला आहे. मणिपूरच्या मोइरांग विधानसभा मतदारसंघातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार करण्यात आला आहे. तर, छत्तीसगडमधील बिजापूरमधील चिहका गावाजवळ निवडणूक ड्युटी दरम्यान IEDचा स्फोट झाला. यात सीआरपीएफचा एक असिस्टंट कमांडंट जखमी झाला. जखमी कमांडंटला उपचारासाठी भैरमगड रुग्णालयात आणण्यात आले आहे. पोलिसांनी स्फोटाला दुजोरा दिला आहे.

पश्चिम बंगालमधील कूचबिहारमधील चांदमारी येथील मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी भाजपचा पोलिंग एजंट जखमी झाला. चांदमारी येथे मतदारांना रोखण्यासाठी टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दुपारी १ वाजेपर्यंत कुठे, किती मतदान? वाचा...

बिहार ३२.४१%

महाराष्ट्र ३२.३६%

उत्तराखंड ३७.३३%

उत्तर प्रदेश ३६.९६%‍

मध्य प्रदेश ४४.१८%

छत्तीसगड ४२.५७%

राजस्थान ३३.७३%

लक्षद्वीप २९.९१%

बिहार ३२.४१%

उत्तराखंड ३७.३३%

उत्तर प्रदेश ३६.९६%

मध्य प्रदेश ४४.१८%

छत्तीसगड ४२.५७%

राजस्थान ३३.७३%

लक्षद्वीप २९.९१%

त्रिपुरा ५३.०४%

पश्चिम बंगाल ५०.९६%

मेघालय ४८.९१%

मणिपूर ४५.६८%

आसाम ४५.१२%

पुद्दुचेरी ४४.९५%

जम्मू आणि काश्मीर ४३.११%

तामिळनाडू ३९.४३%

नागालँड ३८.८३%

सिक्कीम ३६.८२%

मिझोराम ३६.६७%

अंदमान ३५.७०%

अरुणाचल प्रदेश ३४.९९%

हेही वाचा