‘द. गोवा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती नियमबाह्य’ : काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 01:31 pm
‘द. गोवा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती नियमबाह्य’ : काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पणजी : आयपीएस (कॅडर) नियम १९५४ आणि आयपीएस (सक्षम कॅडर) नियम, १९५५ या नियमांनुसार पोलीस अधीक्षकपदावर केवळ आयपीएस कॅडरचा अधिकारीच नियुक्त करणे बंधनकारक आहे. मात्र, दक्षिण गोवा जिल्हा अधीक्षक पदी नियुक्त केलेला अधिकारी आयपीएस कॅडरचा नाही. आदर्श आचारसंहिता लक्षात घेता यावर त्वरित कारवाई करावी, अशी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी गोव्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.


पोलीस अधीक्षक पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी असणे बंधनाकारक आहे. केंद्र सरकारचे तसे नियम आहेत. म्हणजे, आयपीएस (कॅडर) नियम १९५४ आणि आयपीएस (सक्षम कॅडर) नियम, १९५५ या नियमांनुसार हे पद IPS कॅडरमधून आलेल्या अधिकाऱ्याकडे असणे बंधनकारक आहे. पण, या नियमांचे उल्लंघन करून दक्षिण गोवा पोली अधीक्षकपदी आयपीएस नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे कवठणकर यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रकारावर त्वरित कारवाई करावी, अशी विनंती कवठणकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

हेही वाचा