तृणमूलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी लुईझिन फालेरो

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd October 2021, 11:44 pm
तृणमूलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी लुईझिन फालेरो

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदेशानंतर पक्षाने शुक्रवारी फालेरो यांची नेमणूक झाल्याचे जाहीर केले. गेल्याच महिन्यात फालेरो यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने अजून गोव्याचा अध्यक्ष तथा प्रदेश समिती जाहीर केलेली नाही. येत्या २७ किंवा २८ रोजी ममता गोव्यात येणार आहेत. तेव्हा ही समिती जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मडगावचे नगरसेवक डोरिस टेक्सेरा, ऐश्वर्या साळगावकर, उदय गावकर, मनोज तारी यांनी शुक्रवारी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा