इन्सुली कोंडवाडा येथे कदंबा- कारमध्ये अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
इन्सुली कोंडवाडा येथे कदंबा- कारमध्ये अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी

पेडणे : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway)  इन्सुली कोंडवाडा येथे कदंबा व कार यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पणजी - बेळगाव कदंबा इन्सुली कोंडवाडा येथील वळणावर आली असता समोरून येणाऱ्या बेळगाव येथील कारने कदंबला समोरून धडक दिली. सुदैवाने कार मधील प्रवाशांना दुखापत झाली नाही. अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीस (Banda Police) घटनास्थळी दाखल झाले असून; पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा