जनगणना आणि मतदारसंघ फेररचनेपूर्वी सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव करू नये

सांगे ग्रामस्थांचे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
जनगणना आणि मतदारसंघ फेररचनेपूर्वी सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव करू नये

पणजी : नव्यानेजनगणना आणि मतदारसंघ फेररचनेपूर्वीसांगे मतदारसंघ अनुसूचितजमातीसाठी (एसटी)आरक्षित (Schedule Tribereservation, Sanguem constituency) ठेवूनये, अशी मागणी सांगेग्रामस्थांनी केली आहे.या मागणीचे निवेदनत्यांनी केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री श्रीपाद नाईकयांना आज सादर केले. यापूर्वीत्यांनी या मागणीचे निवेदनमुख्यमंत्री डॉ. प्रमोदसावंत यांना सादर केले होते.

केंद्रीयमंत्रीश्रीपाद नाईक यांनी गृहमंत्रीअमित शहा तसेच इतरांकडे चर्चाकरून या मागणीचा पाठपुरावाकरावा, अशी मागणीग्रामस्थांनी केली. निवेदनावर२६ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याआहेत. त्यात पंच,सरपंच अशा स्थानिकलोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

२००१च्या जनगणनेनुसारआधारीत २००८ वर्षी मतदासंघफेररचनेचा आदेश जारी झालाहोता. या आदेशाप्रमाणेसध्याच्या सांगे मतदारसंघाचीसीमा आहे. सांगेमतदारसंघात एसटी लोकसंख्याअसली तरी ती किती आहे, याचीठोस माहिती उपलब्ध व्हायलाहवी. एसटी समुदायालाआरक्षण मिळायला हवे. मात्र,ते योग्य प्रक्र‌ियाकरून मिळायला हवे.

पूर्वीचीजनगणना किंवा २००८ वर्षी जारीझालेल्या मतदारसंघ फेररचनेप्रमाणेसांगे मतदारसंघ आरक्षित ठेवणेहे इतर समाजाला अन्यायकारकठरणार. यासाठी जनगणनाआणि मतदारसंघ फेररचनेनंतरएसटी आरक्षण लागू करावे,अशी मागणी करणारेनिवेदन सांगेच्या लोकांनीकेंद्रीय मंत्री श्रीपादनाईक यांना सादर केले आहे

हेही वाचा