बेरोजगारांना पीएफची पूर्ण रक्कम काढता येणार; ईपीएफओने केले नियमात बदल

विशेष प्रकरणात १०० टक्के रक्कम मिळणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
बेरोजगारांना पीएफची पूर्ण रक्कम काढता येणार; ईपीएफओने केले नियमात बदल

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) (EPFO ) आपल्या नियमात बदल करत कोट्यवधी खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी बेरोजगार झाल्यास किंवा कठीण परिस्थितीत सापडल्यास त्यांना १०० टक्के पीएफ (PF) काढता येणार आहे.

नियमात केलेल्या नव्या बदलामुळे क्लेम रिजेक्ट कमी होणार व कर्मचारी वेळेत आर्थ‌िक मदत मिळवू शकणार, असे ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोकरीवरून काढून टाकल्यास, कर्मचारी कपात करताना नोकरी गेल्यास ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असली तरी कर्मचारी पीएफ काढू शकणार. ही सुविधा केवळ कठीण परिस्थितीत मिळणार आहे.

सामान्य पर‌िस्थितीत ही रक्कम ७५ टक्के एवढीच काढता येणार. कोणताही कर्मचारी दोन महिने वेतनाविना राहिल्यास त्याला १०० टक्के पीएफ काढता येणार. काही विशेष परिस्थितीत कर्मचारी १०० टक्के पीएफ काढू शकणार.

कर्मचारी काम करीत असलेल्या कंपनीत लॉकआऊट करण्यात आला किंवा एखादी कंपनी बंद पडल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्यास कर्मचारी आपला १०० टक्के पीएफ काढू शकतात.

हेही वाचा