मार्ना-शिवोली अपघातप्रकरणात कारचालकासह वाहन मालक महिलेविरुद्ध गुन्हा

गोव्यात खाजगी वाहने भाड्याने देण्याचे प्रकार वाढले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
09th June, 09:50 am
मार्ना-शिवोली अपघातप्रकरणात कारचालकासह वाहन मालक महिलेविरुद्ध गुन्हा

पणजी :  गोव्यात खाजगी वाहने पर्यटकांना भाड्याने देऊन पैसे कमावण्याचे प्रकार वाढले आहेत.  मार्ना-शिवोली (Marna-Siolim) येथे अशाच एका खाजगी कारला अपघात झाल्यानंतर हणजूण पोलिसांनी कारचालकासह वाहनमालक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात दुचाकीस्वार सुश्मिता बेनकर (रा. शेळपे, म्हापसा)  या जखमी झाल्या होत्या.

पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली (Delhi)  येथील विक्रम पटेल हे संबंधित कार चालवत होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित कार ही खासगी नोंदणीची असताना ती भाड्याने देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी वाहन मालक यश्मिता नाईक (रा. हडफडे) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यश्मिता नाईक या एका पोलिसाची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. खासगी वाहनाचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर संबंधित मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हणजूण पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. जखमी सुश्मिता बेनकर यांच्यावर उपचार करण्यात आले असून; त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

हेही वाचा