टी. राजासिंह यांचा सल्ला : फोंडा येथे हिंदू राष्ट्र जागृतीतर्फे जाहीर सभा

फोंडा : राज्यात सुरू असलेला ‘लव जिहाद’ पूर्णपणे बंद होण्याची गरज आहे. गोव्यात लवकरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य लव जिहादमुक्त करण्याविषयी जाहीरनामा प्रसिद्ध करावा. हिंदूनी आपल्या संरक्षणासाठी तलवारी बाळगण्याचा सल्ला आमदार तथा श्रीराम युवा सेनाचे अध्यक्ष टी. राजासिंह यांनी दिला आहे
फोंडा येथे हिंदू राष्ट्र- जागृतीतर्फे आयोजित केलेल्या जाहीर सभेत हैदराबादचे आमदार तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष टी. राजासिंह बोलत होते. यावेळी हिंदू जनजागृतीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सत्यविजय नाईक, राजेंद्र देसाई, मनोज गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भारत लवकरच हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गोव्यात जनसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदा अस्तित्वात येणे सुद्धा गरजेचे असल्याचे टी. राजासिंह यांनी सांगितले.
रमेश शिंदे यांनी देशात अल्पसंख्याक लोकांचा विचार करण्याचा प्रयत्न सोडून दिला पाहिजे. लोकांसमोर खरा इतिहास बोलणे व सांगणे कोणताही गुन्हा नाही. हिंदूंमुळे देशात शांतता निर्माण झाली आहे. गोव्यातील लोक इतिहास व भविष्य जाणून असून हिंदू राष्ट्र बनण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.