कॉंग्रेसने विश्वासघात केल्याचा आरजीचा आरोप

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) ११ उमेदवारांची पहिली यादी कॉंग्रेसने (Congress Party) जाहीर केल्यानंतर विरोधी आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. युतीची बोलणी सुरू असताना कॉंग्रेसने अंधारात ठेवून उमेदवार जाहीर केल्याने आरजीने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप आरजी (RG Party) प्रमुख मनोज परब यांनी केला.
आरजीने नाराजी व्यक्त केल्याने आघाडी होण्यापूर्वीच तुटण्याच्या वाटेवर आहे. २० डिसेंबरला होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे.
भारतीय जनता पक्षाने (BJP) मगोकडे (MGP) युती जाहीर करतानाच १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आम आदमी पक्षाने २९ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपला हरवण्यासाठी कॉंग्रेस, आरजी व गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षांची बोलणी बरेच दिवस सुरू आहे. जागा वाटपाविषयी एकमत होत नसल्याने युतीविषयी निर्णय घेणे अजून पर्यंत शक्य झालेले नाही.
तसेच युती झाल्यास कॉंग्रेसी पेक्षा आरजी व गोवा फॉरवर्डला जास्त फायदा होणार, म्हणून युतीला कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे. अनेक कार्यकर्त्यांचा विरोध असूनही भाजपला हरवण्यासाठी गोवा फॉरवर्ड व आरजी पक्षाकडे युती करण्यासाठी निवड समितीची पसंत आहे. जाग्यांविषयी एकमत होत नसल्याने विरोधकांच्या युतीला अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस समितीची सोमवारी रात्री बैठक होऊन त्यांनी पहिली यादी जाहीर केली.
कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी
उत्तर गोवा
कळंगुट : कॅमेलीना फर्नांडिस (महिला)
सुकूर : साहिल मांद्रेकर (सर्वसामान्य)
रेईश मागूश - सोनल मालवणकर (महिला)
ताळगाव - विजू दिवकर (एसटी)
चिंबल - अॅड. शेजल कळंगुटकर (महिला)
पाळी - भानुदास दत्ता सोननाईक (ओबीसी)
केरी - आयुश सिताराम केरकर (एससी)
दक्षिण गोवा
उजगाव - गांजे - मनिषा उजगावकार
वेळ्ळी - ज्युलीओ फर्नांडिस
कुडतरी - अलेक्सिनो दासिल्वा
सावर्डे : राजेंद्र शिरोडकर
काँग्रेसकडून विश्वासघात : मनोज परब
आरजीला अंधारात ठेवून उमेदवारांची यादी जाहीर करून कॉंग्रेसने आरजीचा विश्वासघात केला. ज्या जागा आरजीने मागितल्या होत्या त्या जाग्यांवर कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केले. युती तुटली तर आरजीचा दोष नाही, असे आरजी प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे. युतीविषयी निर्णय घेण्यासाठी आरजीची आज संध्याकाळी बैठक होणार, असे मनोज परब म्हणाले.