कवी परेश कामत यांना 'विश्वरंग मानद अलंकरण सम्मान' प्रदान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
कवी परेश कामत यांना  'विश्वरंग मानद अलंकरण सम्मान' प्रदान

पणजी : कोंकणी साहित्य अकादमी (Konkani Sahitya Academy) पुरस्कार विजेते कवी परेश नरेंद्र कामत (Poet Paresh Kamat) यांना 'विश्वरंग मानद अलंकरण सम्मान' देऊन गौरवण्यात आले.  रवीन्द्र भवन, भोपाळ येथे घडवून आणलेल्या तीन दिवसीय 'विश्वरंग अंतरराष्ट्रीय साहित्य व कला महोत्सवात' मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या हस्ते कामताना हा सम्मान प्रदान करण्यात आला. 

यावेळी व्यासपिठावर मॉरीशस गणराज्याचे पूर्व राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन, मध्यप्रदेशचे संस्कृतीक मंत्री धर्मेंद्र भाव सिंह लोधी, रवीन्द्रनाथ टागोर विश्वविद्यालयाचे कुलाधिपती संतोष चौबे उपस्थित होते. शाल, पुष्पगुच्छ, ताम्रधातूने मढवलेली रवीन्द्रनाथ टागोरांची प्रतिकृती व प्रशस्तिपत्र असे ह्या सन्मानाचे स्वरूप आहे. कोंकणी भाषेला हा सन्मान पहिल्यांदाच प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात आली. 

या तीन दिवसीय भरगच्च 'विश्वरंग महोत्सवात' साहित्य, कला, संगीत, भाषा, सिनेमा, अंतरराष्ट्रीय संवाद, प्रकट मुलाखती, चर्चासत्रे, कविसंमेलने आयोजीत करण्यात आली होती. ६५ देशांतील सुमारे हजाराहून अधिक कवी, साहित्यिक, कलाकार, गीतकार, संगितकार, फिल्ममेकर सहभागी झाले होते.  यावेळी राष्ट्रीय पातळीवरील कवींच्या बहुभाषिक कविसंमेलनात भाग घेऊन परेश कामत यांनी आपल्या काही कोंकणी कवितांचे हिंदी अनुवाद सादर केले.

हेही वाचा