झेडपी निवडणूक पुढे ढकलण्याची केली होती विनंती : सीईओ

संजय गोयल यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक


2 hours ago
झेडपी निवडणूक पुढे ढकलण्याची केली होती विनंती : सीईओ

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : मतदार पडताळणी (एसआयआर) मोहिमेमुळे जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाने सरकारला केली होती, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर सांगितले.        

जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले. सुधारित मतदार यादी ७ फेब्रुवारी रोजी निश्चित होणार आहे. सरकारला जिल्हा पंचायत निवडणुका त्यापूर्वी घ्यायच्याच असतील तर घ्यायला हरकत नाही. जिल्हा पंचायत निवडणूक व एसआयआरसाठी वेगवेगळे निवडणूक अधिकारी (आरओ) आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी (एआरओ) असायला हवेत, असेही सरकारला कळविण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.       

२००२ वर्षापासून  देशात कुठल्याही  राज्यात मतदार यादीत ज्याच्या आई वडिलांचे असेल, तर ती व्यक्ती  भारतीय नागरिक होते. राज्यातील नेपाळी लोकांच्या मतदार यादीतील नावांविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगानुसार मतदार पडताळणीवेळी १३ दस्तावेवज पुरावा म्हणून देऊ न शकलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सांगितले.

अर्ज वितरण १०० टक्के!

मतदार पडताळणीचे (एसआयआर) अर्ज १०० टक्के वितरण करण्यात गोवा हे पाहिजे राज्य बनले अाहे. तसेच  ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्यातील नगरपालिकांमध्ये  मदत कक्ष उभारण्यात येणार आहे. जेणेकरून लोकांना ऑनलाईन अर्ज भरणे सोयीस्कर होऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदार पडताळणी अर्ज ऑनलाईन भरावे, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सांगितले.

हेही वाचा