दिल्ली स्फोटानंतर गोव्यात अलर्ट; एका रात्रीत १ हजार वाहनांची तपासणी

पर्यटम हंगाम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
37 mins ago
दिल्ली स्फोटानंतर गोव्यात अलर्ट; एका रात्रीत १ हजार वाहनांची तपासणी

पणजी :  दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानंतर (Delhi Red Fort area Blast), गोव्यात (Goa)  ‘हाय अलर्ट’ (High Alert) जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी (Goa Police)  संवेदनशील भागात आणि सीमावर्ती ठिकाणी तपासणी आणि गस्त वाढवली आहे. एकाच रात्री २ हजारहून अधिक लोकांची व १ हजारहून वाहनांची तपासणी केली आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले होते की, स्फोटानंतर राज्यात खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. दिल्ली स्फोटानंतर खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. 

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर गोवा पोलिसांनी राज्यात व्यापक तपासणी मोहीम सुरू केली. त्यात एकाच रात्रीत २ हजारहून अधिक लोकांची आणि १ हजारहून अधिक वाहनांची पडताळणी केली. सीमा चौक्या, रेल्वे स्थानके आणि प्रमुख जंक्शनवर सुरक्षा तपासणी करण्यात आली, तसेच नाकाबंदी करण्यात आली.

सूत्रांनी सांगितले की, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी या मोहीमेत सहभागी झाले होते. त्यांना कडक दक्षता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोव्यात सध्या पर्यटन मौसम सुरू आहे व पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण म्हणून पसंती आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. आमची नियमित तपासणी सुरू होती. मात्र, दिल्ली बॉंबस्फोटामुळे गोव्यात कडक तपासणी करावी लागत आहे.

दाऊद इब्राहिमच्या एक सहकारी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींना अलिकडेच अटक करण्यात आली होती. त्यामुळे कडक सुरक्षा उपाययोजना हाती घेणे आवश्यक असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

पोलीस आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांची तपासणी सुरू केली आहे.  जिथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात, विशेषतः चालू असलेल्या मंदिर उत्सवांमध्ये. 

द. गोव्यात १ हजार ३८ लोक, ६७० वाहनांची तपासणी 

दक्षिण गोव्यात, जिल्हा पोलिसांनी १० नोव्हेंबरच्या रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली. १,०३८ लोक आणि ६७० वाहनांची तपासणी केली.  दिल्लीतील प्राणघातक स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण गोव्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नाकाबंदी वाढवण्यात आली आहे, तसेच रात्रीची गस्त वाढवणे, संशयास्पद वाहनांची पडताळणी करणे आणि गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवणे, असे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले. 

 रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी कडक देखरेख असल्याचे ते पुढे म्हणाले. 

‘‘ ड्रग्ज तस्करी, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, वाहन चोरी आणि असामाजिक घटकांच्या हालचाली यासारख्या बेकायदेशीर कृत्यांचा शोध घेणे आणि त्यांना प्रतिबंध करणे आहे,"  हा मोहीम राबवण्यामागे उद्देश असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

विनाकारण फिरताना आढळलेल्या संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली आणि कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.


हेही वाचा