टॅक्सी माफियांचा धाक ! हवालदिल पर्यटक महिलेने सामानासह केली १ किमी पायपीट

सोशल मिडियावर कथन केला अनुभव; १५ दिवसांत दुसरी घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd October 2025, 04:05 pm
टॅक्सी माफियांचा धाक ! हवालदिल पर्यटक महिलेने सामानासह केली १ किमी पायपीट

पणजी: नुकताच पर्यटन हंगामाचा श्री गणेशा झाला. पावसाळ्यात मरगळलेल्या पर्यटन क्षेत्राला आता नवसंजीवनी मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी भाबडी अपेक्षा ठेवून अनेकांनी आपला व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान गोव्यातील टॅक्सी चालकांच्या वाढत्या दादागिरीमुळे पर्यटकांना होणारा त्रास थांबण्याचे नाव घेत नाहीये. गुजराती पर्यटक महिलेला त्रास झाल्याच्या घटनेला पंधरा दिवस झाले नसतानाच, गोव्यातून अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टॅक्सी माफियांना घाबरून गोवा माईल्सच्या चालकाने हॉटेलजवळ येण्यास नकार दिल्याने एका पर्यटक महिलेला सामानासह एक किलोमीटरची पायपीट करावी लागली.



चालकाकडून जीवाला धोका असल्याची भीती

या पर्यटक महिलेने याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. व्हिडिओ तिने तिच्यावर ओढवलेली परिस्थिती कथन केली आहे. मी हॉटेलपासून एक किलोमीटर चालत आली आहे. आम्ही 'गोवा माईल्स'ची टॅक्सी बुक केली होती, परंतु त्यांना हॉटेलजवळ येण्यास परवानगी नाही. आमचा ड्रायव्हर सांगू लागला की तो तिथे आला तर त्याच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सामानासह तीन बॅगा घेऊन आम्ही एवढ्या दूर चालत आलो आहोत. या घटनेमुळे गोव्याच्या किनारपट्टी भागात टॅक्सी माफियाचा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.


बाहुबली सावंत ने टैक्सी माफिया को काबू में किया! - गोवा ऑब्जर्वरगोवा  ऑब्जर्वर


पंधरा दिवसांतील दुसरी घटना

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात अहमदाबाद येथील एका पर्यटक महिलेला स्थानिक टॅक्सी चालकांनी त्रास दिला होता. ऑनलाईन बुक केलेल्या टॅक्सीतून जाण्यापासून तिला रोखण्यात आले होते, ज्यामुळे तिला भर पावसात बॅगा घेऊन चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागली होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.


After 'Gundagardi' By 'Taxi Mafia', #BoycottGoa Trends On X — Video Of  Ahmedabad Woman's 'Harassment' | Viral News - News18


नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी

महिलेने शेअर केलेल्या या अनुभवावरून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोव्यातील वाहतूक व्यवस्था आणि टॅक्सी चालकांच्या दादागिरीवर सरकारने आणि पोलिसांनी तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. काही जणांनी त्यांच्यासोबतही गोव्यात अशाच प्रकारची घटना घडल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी 'स्थानिक टॅक्सी चालक खूप पॉवरफूल असून, याबद्दल काही केले जाऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया देऊन आपली हताशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा