पणजी : बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण : गोव्यातून अटक झालेली आयेशा 'फंड मॅनेजर'!

तर पती निघाला ‘लीगल अॅडवायझर’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
पणजी : बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण : गोव्यातून अटक झालेली आयेशा 'फंड मॅनेजर'!

पणजी :देशभर गाजत असलेल्या बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी सकाळी जूने गोवे आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा ऊर्फ निक्की (३५) हिला अटक केली. ती मूळची ओडिशाची असून सध्या गोव्यात सांतान-तळावली, सांतआंद्रे येथे भाड्याच्या घरात राहत होती. ती हल्लीच ती कुटुंबियांसमवेत जूने गोवे येथील एका खाजगी इस्पितळाच्या परिसरात असलेल्या इमारतीत स्थायिक झाली होती. शुक्रवारी तिला परराज्यातून अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नेण्यात आले.तिच्यासह या कामात गुंतलेल्या इतर ९ जणांच्या देखील मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.




ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांनी राबवलेल्या 'मिशन अस्मिता' मोहिमेअंतर्गत करण्यात आली. आयेशा ही कथितपणे देशभरात धर्मांतर घडवणाऱ्या कट्टरपंथी जिहादी रॅकेटची आर्थिक व्यवस्थापक (फंड मॅनेजर) असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटसाठी युएई, अमेरिका, कॅनडा व लंडन येथून आलेले कोट्यवधी रुपये आयेशाच्या खात्यांमध्ये जमा व्हायचे, ती ही रक्कम भारतात धर्मांतर आणि ब्रेनवॉशिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या खात्यांमध्ये वर्ग करत होती. सैयद दाउद अहमद हा  कॅनडामधून निधी पाठवायचा, अशी गंभीर माहिती तपासात पुढे आली आहे. या रॅकेटचे लागेबांधे दहशतवादी गट लश्कर-ए-तैयबाशी असल्याचे देखील तपासात स्पष्ट झाले आहे.


Operation Asmita | 'Religious conversion': 10 held from six states |  Lucknow News - The Indian Express


आयेशाचा पती अली हसन ऊर्फ शेखर राय हा कोलकात्याचा रहिवासी असून, तेथील एका कोर्टात कर्मचारी आहे. तो या रॅकेटचालीगल अॅडवायझर’ म्हणून कार्य करत होता. धर्मांतरासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर अडचणी टाळण्याचे काम त्याच्याकडे होते.

कॅनडातून सैयद दाऊद अहमद या व्यक्तीकडून आयेशाच्या खात्यांमध्ये नियमितपणे रक्कम पाठवली जात होती. ही रक्कम भारतात हवालामार्फत इतर सदस्यांपर्यंत पोहोचवली जात होती. दाऊद सोशल मीडियावर जिहादी प्रचारासाठी व्हिडीओ तयार करून त्याचे प्रसारण करत होता.

या नेटवर्कमध्ये सर्वात धोकादायक अॅसेट हा आग्राचा अल रहमान कुरैशी असून, तो युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना धर्मांतरासाठी ब्रेनवॉश करत होता. त्याच्यासोबत पकडलेला कोलकात्याचा ओसामा या मुलींना त्यांच्या कुटुंबांपासून तोडण्याचे काम करत होता.

आयेशा  ही सुशिक्षित असून गोव्यात तिचे स्वतःचे घर आहे. ती गेल्या काही वर्षांपासून येथे राहत होती. तिचे वडील माजी लष्करी अधिकारी (सुबेदार) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने गोव्यात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कता वाढवली आहे. तपास अधिक गहिरा केला असून, या रॅकेटची गुंतवणूक, स्थानिक संपर्क आणि पुढील घडामोडी यावर अधिक लक्ष ठेवले जात आहे.


Illegal conversion All members of gang had different responsibilities Earlier young women were lured into trap


प्रकरणाच्या तपासात आग्रा पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत एका महिला उपनिरीक्षकाच्या माध्यमातून जिहादी रॅकेटपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. सोशल मीडियावर बनवलेल्या बनावट इंस्टाग्राम आयडीच्या मदतीने ही महिला पोलीस थेट आरोपींच्या संपर्कात आली आणि त्यातूनच संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले.

तपासादरम्यान, पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांकांच्या लोकेशन आणि कॉल डिटेल्सची बारकाईने छाननी केली. इंटरनेटवर सक्रिय असलेल्या एका संशयित आयडीविषयी धागेदोरे मिळाल्यानंतर या रॅकेटचा माग काढण्यात यश मिळाले.

रॅकेटमधील सदस्यांनी इंटरनेट मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून मोठे नेटवर्क तयार केले होते. याचा वापर करून हिंदूइतर गैर-मुस्लिम तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. पोलिसांनी या गँगपर्यंत पोहोचण्यासाठीडिजिटल इन्फिल्ट्रेशन’चा वापर केला. यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि जाळ्यातील प्रमुख आरोपींचा पर्दाफाश झाला.


Illegal conversion All members of gang had different responsibilities Earlier young women were lured into trap