अमेरिका : मूळ भारतीय वंशाच्या काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्त

ट्रम्प सरकारच्या मागील टर्ममध्ये गुप्तहेर विभागात उल्लेखनीय काम केल्याचा मोबदला त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
अमेरिका : मूळ भारतीय वंशाच्या काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्त

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (FBI) या तपास संस्थेच्या पुढील संचालकासाठी भारतीय वंशाच्या कश्यप 'काश' पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये याची घोषणा केली.

या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या भूतकाळातील कामाचेही कौतुक केले आहे. याआधी काश पटेल यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयात चीफ ऑफ स्टाफ, नॅशनल इंटेलिजन्समध्ये डेप्युटी डायरेक्टर आणि नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये दहशतवादविरोधी कार्यक्रमांचे वरिष्ठ संचालक म्हणून काम केले आहे.

ट्रम्प और काश पटेल की पहली मुलाकात 2016 में हुई थी। काश पटेल, डोनाल्ड ट्रम्प के सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘ट्रुथ’ का कामकाज भी देखते हैं। - Dainik Bhaskar


'कश्यप 'काश' पटेल एफबीआयचे पुढील संचालक म्हणून काम करतील याचा मला अभिमान आहे, असे ट्रम्प म्हणाले. काश पटेल यांचे कौतुक करताना ट्रम्प यांनी त्यांना 'अमेरिकाज फर्स्ट फायटर' असे संबोधले आहे. काश पटेल यांनी आपली कारकीर्द भ्रष्टाचार उघड करण्यात, न्याय स्थापित करण्यात आणि अमेरिकन लोकांचे रक्षण करण्यात घालवली, असे गौरवोद्वार ट्रम्प यांनी काढले. अमेरिकेतील वाढता गुन्हेगारी दर, गुन्हेगारी टोळ्या आणि सीमेवर होत असलेल्या मानवी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी काश पटेल यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.

Trump nominates Kash Patel to serve as new FBI director - Lynnwood Times


काश पटेल यांच्या विषयी 

काश पटेल हे भारतीय निर्वासित कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला. काश पटेलचे आई-वडील १९७० च्या दशकात युगांडाचे शासक इदी अमीन यांच्या देश सोडण्याच्या आदेशाच्या भीतीने कॅनडामार्गे अमेरिकेत पळून गेले. पटेल यांच्या वडिलांना १९८८ मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांना विमान कंपनीत नोकरी मिळाली. २००४ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर पटेल यांना मोठ्या लॉ फर्ममध्ये नोकरी मिळाली नाही तेव्हा त्यांनी सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना त्यांच्या मनाजोगती नोकरी मिळवण्यासाठी त्यांना ९ वर्षे वाट पाहावी लागली.


Who is Kash Patel, Trump's FBI director pick who vowed to shut agency on  day one - India Today


काश पटेल २०१३ मध्ये वॉशिंग्टनमधील न्याय विभागात रुजू झाले. येथे, तीन वर्षांनंतर,२०१६ मध्ये, पटेल यांना गुप्तचर प्रकरणांशी संबंधित स्थायी समितीमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डेव्हिड न्युन्स हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक व जिवलग मित्र  होते. त्यांनीच पटेल यांची गाठ ट्रम्पशी घालून दिली. काश पटेल यांनी अल्पावधीतच आपल्या कामाने ट्रम्प यांचा विश्वास संपादन केला. पटेल यांनी त्यांच्या पहिल्याच वर्षात बेकायदा शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या सिंडीकेटचा भांडाफोड केला. ही शस्त्रे मेक्सिकोच्या टीऊआना येथून संघटित माफियांच्या हस्तकांमार्फत  अमेरिकेत येत होती. विशेष म्हणजे याच वर्षी अमेरिकेत मास शुटींगचा प्रकार तब्बल ६४ टक्के कमी झाला होता. 

Alec Lace | BREAKING: Donald Trump has announced that KASH PATEL will be  the next director of the FBI Kash was the ONLY choice for this position  and... | Instagram

 

ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ज्यो बायडेन यांच्या मुलाची माहिती गोळा करण्यासाठी २०१९  मध्ये युक्रेनवर दबाव आणला होता. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर संतापले. कोणतीही कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी ट्रम्प यांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी सल्लागारांची एक टीम तयार केली. त्यात काश पटेलचेही नाव होते. या यादीत त्यांचे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. काश पटेल २०१९ मध्ये ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यानंतर यशाची शिखरे सर करत राहिले. ते ट्रम्प प्रशासनात फक्त १ वर्ष ८ महिने राहिले, पण सर्वांच्या नजरेत आले. द अटलांटिक मासिकाने दिलेल्या वृत्तात पटेल यांचे वर्णन 'ट्रम्पसाठी काहीही करू शकणारी व्यक्ती' असे केले आहे.


Potential Trump FBI director pick boasted openly about plans to jail  journalists


ट्रम्प प्रशासनात, जवळजवळ प्रत्येकजण आधीच ट्रम्प यांच्याशी एकनिष्ठ होता, त्यात त्यांची गणना ट्रम्पच्या सर्वात निष्ठावान लोकांमध्ये होत होती. त्यामुळे अनेक अधिकारी त्यांना घाबरत होते. विशेष म्हणजे काश पटेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'च्या कामकाजावरही देखरेख ठेवतात. पटेल यांनी २०२२ फिफा विश्वचषकादरम्यान कतारसाठी सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले होते.

Donald Trump picks Indian origin nominee Kash Patel as new FBI Director |  World News - News9live

हेही वाचा