मुंबई : ट्रायने कमर्शियल मेसेज आणि OTP शी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करायची होती, मात्र अनेक कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
टेलिकॉम कंपन्या ट्रायचा हा नियम १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू करू शकतात. हा नियम लागू झाल्यानंतर दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील आणि यावरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे, ग्राहकांना ओटीपी मिळण्यात काहीसा विलंब होऊ शकतो.
स्पॅम कॉल किंवा स्पॅम मेसेज काय आहेत?
स्पॅम कॉल किंवा मेसेज हे अनोळखी नंबरवरून लोकांना केलेले कॉल किंवा मेसेज असतात. यामध्ये कॉल किंवा मेसेज करत कर्ज, क्रेडिट कार्ड, लॉटरी ऑफर्स किंवा तत्सम कंपनीकडून कोणतीही सेवा किंवा उत्पादन खरेदी करण्याचे आमिष दाखवत लोकांना फसवले जाते.