चमचमीत सोया मसाला

Story: चमचमीत रविवार |
17 hours ago
चमचमीत सोया मसाला

साहित्य 

३ काप पाणी, १ कप सोयाबिन, १ दालचिनी तुकडा, ४ ते ५ काळी मिरी, २ ते ३ लवंगा, २ ते ३ तमाल पत्र, चवीनुसार मीठ, १ मोठा कांदा उभा चिरलेला, १ टोमॅटो बारीक चिरलेला, काजू तुकडे/बदाम तुकडे, १ चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणेपूड, लाल तिखट, कोथिंबीर. 

कृती 

प्रथम एका भांड्यात ३ कप पाणी उकळत ठेवा. पाणी उकळलं की त्यात १ कप सोयाबीन घाला. त्याबरोबर खडे मसाले टाका. यात ते मसाले घालण्याचं कारण म्हणजे सोयाबिनचा कडवटपणा कमी व्हावा आणि त्यांना खडे मसाल्याची चव मिळावी. हे सर्व ८ ते १० मिनिटं उकळत ठेवा. हे झालं की यातलं उरलेलं पाणी काढून घ्या. आता एका भांड्यात २ ते ४ चमचे तेल तापत ठेवा. यात उभा चिरलेला कांदा घाला. कांद्याला हलका सोनेरी रंग आला की यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि काजू तुकडे/बदाम तुकडे घाला. हे पूर्ण एकत्र करा आणि ३ ते ४ मिनिटं शिजत ठेवा. हे मिश्रण थंड करायला ठेवा. थंड झालं की मिक्सरला वाटा. शक्यता पाण्याचा वापर करू नका. पुन्हा एकदा एका कढईत तेल घ्या. ते तेल गरम झालं की हे वाटण घाला. एकत्र करा. ३ ते ४ मिनिटात बारीक गॅसवर ठेवा. मग यात १ चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणेपुड आणि लाल तिखट घाला. याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. मग यात थोडंसं गरम पाणी घाला. हे पूर्ण एकत्र करा. यात चवीनुसार मिठ घाला. आपण सोयाबीनमध्ये आधी मीठ घाललं आहे त्या नुसार आता यात घाला. आता यात सोयाबीन घाला. आता यात कोथिंबीर घाला व बारीक गॅसवर ७ ते ८ मिनिटे शिजवून घ्या. तर अश्या प्रकारे चमचमीत सोया मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे.


संचिता केळकर