फोंडा : पालवाडा- उसगाव येथील राजू वागू कोकरे याच्या मालकीची होंडा सिटी कार घरगुती कार्यक्रमासाठी मागून नेलेल्या राजशेखर सी. व शोभराज राजशेखर (मूळ कर्नाटक) या पिता -पुत्राने परत न केल्यामुळे फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर कार दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी नेण्यात आली होती. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन नाईक अधिक तपास करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, घरगुती कार्यक्रमासाठी पिता - पुत्राने जीए - ०५- एल - ००५३ क्रमांकाची होंडा सिटी कार तक्रारदाराकडून मागून घेतली होती. कार मालकाने वारंवार कार परत देण्याची विनंती केली होती. मात्र अजूनपर्यंत कार परत केली नसल्याने शुक्रवारी रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.