फोंडा: नवसाला पावणारी म्हणून गोवा तसेच गोव्याबाहेर देखील ख्याती पसरलेल्या मडकईच्या नवदुर्गा देवीच्या जत्रोत्सवास उद्या रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सुरुवात होत आहे. देवीचा जत्रोत्सव रविवारी व सोमवारी असा दोन दिवस साजरा केला जाईल. या जत्रोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरल्याने उत्सवात शबागी होण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या सख्येने लोक येतात. यंदाही ५ हजारांहून अधिक भाविक या जत्रोत्सवास हजेरी लावत देवीचे आशीर्वाद घेतील. नवदुर्गा प्रतिष्ठानचे सदस्य तसेच सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी दिली आहे.
असा असेल एकंदरीत कार्यक्रम
रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २. ३० वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. सकाळी महाभिषेक, दुपारी ३.३० वा. महानैवेद्य होणार आहे. सोमवार दि. २५ नोव्हेंबर पहाटे ५.३० वा. व सायं. ४ वा. रथोत्सव (सकाळी १० वा. दिवजोत्सव), रात्रौ ८.३० वा. सभापूजा व जत्रौत्सवाची सांगता रात्रौ ९ नंतर मंदिर बंद केले जाणार आहे.