पणजी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गाच्या जनतेने आपले मते महायुतीच्या पदरात टाकल्याचे दिसून आले आहे. येथील तीन मतदारसंघ, सावंतवाडी-कुडाळ-कणकवलीत येथील जनतेने महाविकास आघाडीला पूर्णतः नाकारत महायुतीला निवडून दिले आहे. सावंतवाडीत केसरकरांचा विजय झाला असून कणकवलीत नितेश राणे यांनी विजय मिळवला. तर कुडाळ-मालवण मतदारसंघातून निलेश राणे रांनी विज्यास गवसणी घातली आहे
केसरकरांनी 'वाडी' राखली
सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना दीपक केसरकर यांनी तब्बल ३९७२७ मतांनी विजय साजरा केला आहे. केसरकर यांनी विजयाचा रंजन तेली यांचा पराभव करत विजयाचा चौकार मारला आहे. केसरकर यांनी ८०३८९ तर राजन तेली यांनी ४०६६२ विशाल परब यांनी ३३०५१ आणि अर्चना घारे यांनी ६०१९ इतकी मते मिळवली आहेत. महायुतीचे दीपक केसरकर विजयी झाल्यानंतर महायुतीच्या आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
कुडाळात निलेश राणे
कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २२व्या फेरीअखेर निलेश राणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. ते ८३४४ मतांनी विजयी झाले आहेत..
कणकवलीकरांची पसंती नितेश राणेंना
कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांनी १०७१७४ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या (उबाठा) संदेश पारकर यांचा ५७६०१ मतांनी पराभव केला.
बातमी अपडेट होत आहे.