महाराष्ट्राचा महानिकाल : वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर सलग ९व्यांदा विजयी

कोळंबकर हे नारायण राणेचे कट्टर समर्थक मानले जातात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
महाराष्ट्राचा महानिकाल : वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर सलग ९व्यांदा विजयी

मुंबई : वडाळ्यात भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी दमदार विजय मिळवला. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचा त्यांनी २४९७३ मतांनी पराभव केला. श्रद्धा जाधव या मुंबईच्या महापौर राहिल्या आहेत. 

कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.  पक्ष बदलून ज्या ज्या ठिकाणी नारायण राणे गेले तेथे कोळंबकरही पाठोपाठ गेलेत. १९९० ते २००४ या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. २०१९ पर्यंत ते सातत्याने ८ वेळा निवडणुका जिंकत आलेत.

वडाळा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातला महत्त्वाचा मतदारसंघ असून, आठ वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर यांना भाजपाने  पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे, कालिदास कोळंबकर हे शिवसेना पक्षातर्फे पाच वेळा नायगावमधून निवडून आलेत, तर तीन वेळा वडाळ्यातून ते आमदार राहिलेत. वडाळा विधानसभेची जागा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रमुख स्थान राहिले. वडाळ्याचा परिसर पश्चिमेला दादर, वायव्येला माटुंगा आणि दक्षिणेला शिवडी या भागांनी वेढलेला आहे, त्यामुळे ते मुंबई शहराचे मध्यवर्ती उपनगर बनले आहे. 

हेही वाचा