झारखंड निवडणूक निकाल: जेएमएम, इंडि आघाडीने ट्रेंडमध्ये मिळवले बहुमत, ५१ जागांवर आघाडी

हेमंत मंत्रिमंडळातील ४ मंत्री मागे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
झारखंड निवडणूक निकाल: जेएमएम, इंडि आघाडीने ट्रेंडमध्ये  मिळवले बहुमत, ५१  जागांवर आघाडी

रांची : झारखंडमधील ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ट्रेंडमध्ये झामुमो आघाडी ५१  जागांवर आघाडीवर आहे. भाजप प्रणीत एनडीए २८ जागांवर आघाडीवर आहे. इतर २ जागांवर ते आघाडीवर आहेत. १३ आणि २०  नोव्हेंबर रोजी राज्यातील ८१  जागांवर मतदान झाले असून ६८ टक्के मतदान झाले आहे. 

ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे. सरकार स्थापन करण्यासाठी येथे बहुमताचा आकडा ४१  आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने ३० , काँग्रेसला १६  आणि आरजेडीने एक जागा जिंकली होती. तिन्ही पक्षांची युती होती. त्यानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या.

हेमंत यांच्या पत्नी कल्पना सोरेन गांडे मतदारसंघातून १२  हजार मतांनी पिछाडीवर आहेत. सोरेन मंत्रिमंडळातील चार मंत्री, दीपिका पांडे सिंग, बन्ना गुप्ता, मिथिलेश ठाकूर आणि रामेश्वर ओराव पिछाडीवर आहेत. दुमका मतदारसंघातून सोरेन कुटुंबातील तीन उमेदवार,  सीता सोरेन (भाजप) जमतारा, धाकटी सून कल्पना सोरेन आणि धाकटा मुलगा बसंत सोरेन पिछाडीवर आहेत. बऱ्हेतमधून हेमंत सोरेन आघाडीवर आहेत. ट्रेंडमध्ये आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

हेही वाचा