शिंदे म्हणाले- पुढील मुख्यमंत्री तिन्ही पक्ष ठरवतील. महाराष्ट्राचे तख्त कुणाचे ? वाचा क्षणाक्षणाचे अपडेट्स
मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजण्यात आल्या. सकाळी ८:३० वाजता ईव्हीएम उघडले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत आहे.
दरम्यान आतापर्यंत समोर आलेल्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये महायुती आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. २०१९ च्या तुलनेत यावेळी ४ टक्के जास्त मतदान झाले. २०१९ मध्ये ६१.४१ टक्के मतदान झाले. तर यंदा ६५.११ टक्के मतदान झाले. एक्झिट पोल्समध्ये ११ पैकी ६ एजन्सींनी निवडणुकांमध्ये भाजपची महायुती सरकार स्थापन करेल असे संकेत दिलेत होते. ४ एजन्सींनी महाविकास आघाडीला आणि एका पोलिंग एजन्सीने त्रिशंकू विधानसभा होईल असा अंदाज वर्तवला आहे. आजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पेज रीफ्रेश करत रहावे.
* कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांचा ८३४४ मतांनी विजय
* कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांनी १०७१७४ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या (उबाठा) संदेश पारकर यांचा ५७६०१ मतांनी पराभव केला.
* शिवसेनेचे (शिंदे गट) सावंतवाडीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा तब्बल ३९,७२७ मतांनी पराभव करीत सावंतवाडी मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवला.
* निपारमधून राष्ट्रवादीचे अजित गटाचे उमेदवार शंकरराव विजयी झाले.
* श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाच्या उमेदवार आदिती सुनील विजयी झाल्या आहेत.
* पालघरमधून राजेंद्र गावित आणि भिवंडी ग्रामीणमधून शांताराम तुकाराम विजयी झाले.
* माढा येथून राष्ट्रवादीचे शरद गटाचे उमेदवार अभिजीत पाटील विजयी झाले.
* कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांनी १०७१७४ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या (उबाठा) संदेश पारकर यांचा ५७६०१ मतांनी पराभव केला.
* घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पराग शहा ३४९९९ मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या (शरद गटाच्या) राखी जाधव यांचा पराभव केला.
* वडाळ्यात भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी दमदार विजय मिळवला. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचा त्यांनी २४९७३ मतांनी पराभव केला.
* १२:५० वाजता : भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १२४ जागांवर भाजप पुढे आहे, म्हणजेच भाजप ८३ टक्के जागांवर आघाडीवर आहे.
* राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 'मी महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानतो. हा जबरदस्त विजय आहे. महायुतीला मोठा विजय मिळेल, असे मी आधीच सांगितले होते. समाजातील सर्व घटकांचे मी आभार मानतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो.' असे ते म्हणाले.
* ११:२५ वाजता : कराड दक्षिण मतदारसंघात ७ व्या फेरीअखेर ८०३९ मतांनी भाजपचे अतुल भोसले आघाडीवर. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
* ११:१८ वाजता : महायुती २१६ जागांवर आघाडी तर महाविकास आघाडीचे ५१ जागांवर वर्चस्व. अपक्ष उमेदवार २० जागांवर पुढे
* ११:१४ वाजता : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे ५०५३१ मतांनी आघाडीवर. धनंजय मुंडे यांची निर्णायक आघाडी
* १०:५४ वाजता : पुणे कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांची आघाडी. सहाव्या फेरीनंतर ३०५०० मतांची आघाडी. चंद्रकांत पाटील यांना ३० हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी
* महायुती २०० पार!
भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार २०५ पेक्षा जास्त जागांवर पुढे. महाविकास आघाडी ५५ जागांवर पुढे.
* १०.१० वाजता : महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार!
आतापर्यंत भाजपला सर्वाधिक जागांवर आघाडी. भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी सुसाट. महाविकास आघाडी मागे.
* ९. २० वाजता : आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंडनुसार महायुतीने १३३ जागांवर आघाडी मिळवली असून महाविकास आघाडीचे ३३ जागांवर वर्चस्व दिसून आले आहे. ८ ठिकाणी इतरांचा वरचष्मा आहे.
*९.०० वाजता : कोण कुठे पुढे ?
शिवरी विधानसभा मतदारसंघातून यूबीटीचे अजय चौधरी पुढे आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर मागे आहेत.
या जागेवर - भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे
-घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शहा पुढे आहेत.
-भोकरमधून भाजपच्या उमेदवार आणि अशोक चव्हाण यांच्या कन्या पुढे आहेत.
-बोरिवलीतून भाजपचे संजय उपाध्याय पुढे आहेत.
-घाटकोपर पश्चिम विधानसभेच्या लार पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू.
*८:५० वाजता : महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली असून. ५० जागांवर महायुतीची आघाडी. २८ जागांवर महायुतीचे वर्चस्व, तर ४ जागांवर इतरांनी बढत मिळवली आहे
.