जॉब वार्ता : कर्मचारी भरती आयोगाविषयी महत्त्वाची अपडेट

१९२५ रिक्त पदांसाठी जाहिराती डिसेंबरपासून

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st November, 04:46 pm
जॉब वार्ता : कर्मचारी भरती आयोगाविषयी महत्त्वाची अपडेट

पणजी : यापुढे सरकारी खात्यांना भरतीसाठी निश्चित पदांचाच आकडा आणि माहिती कळविणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी  प्रस्तावित पदांचा आकडा दिला जात होता. कर्मचारी भरती आयोग नियम ४ मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली असून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच १९२५ पदे भरण्यासाठी राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत  डिसेंबरपासून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. 

कर्मचारी भरती आयोग नियम ५ मध्ये देखील बदल करण्यात आला असून, एखाद्या उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे सादर नसतील किंवा चुकीची कागदपत्रे सादर केली असल्यास, कोणतेही कारण न देता संबंधित अर्ज फेटाळण्याची मुभा आता आयोगाला प्राप्त झाली आहे.  

यापूर्वी परीक्षा सभागृहात किमान २ पर्यवेक्षक नेमणे बंधनकारक होते. कर्मचारी भरती आयोग नियम १० मध्ये बदल करण्यात आला असून आता एकच पर्यवेक्षक नेमला जाईल. काही विशिष्ट पदांसाठी आवश्यक असलेली कुशलता चाचणी आयोग आता स्वतः किंवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त समितीद्वारे घेऊ शकतो.  नियम १२ मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार निवड यादीसह पदांच्या आकड्यांच्या ४० टक्के प्रमाण असलेली वा ५ उमेदवारांची (संख्या जास्त असेल तो आकडा) प्रतीक्षा यादी बनवली जाणार आहे. पूर्वी प्रतीक्षा यादी २५ टक्के वा २ उमेदवारांची बनवली जायची.  


हेही वाचा